Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Bombay High Court | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कुक पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Bombay High Court) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Bombay High Court) इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद 431009.

जाहिरात पाहा (View Ad)

https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20230411121818.pdf

अधिकृत वेबसाईट

https://bombayhighcourt.nic.in/

महत्वाच्या बातम्या