Share

IPL 2023 | पराभवानंतर KKR ला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू संघातून बाहेर?

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: काल (14 एप्रिल) ईडन गार्डनच्या मैदानावर हैदराबाद (SRH) आणि कोलकत्ता (KKR) संघ आमने-सामने आले होते. या सामन्यामध्ये हैदराबादने 23 धावांनी कोलकतत्त्यावर विजय मिळवला. या पराभवानंतर केकेआर संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर जाण्याची शक्यता आहे.

काल झालेल्या सामन्यामध्ये (IPL 2023) हैदराबाद विरुद्ध आंद्रे रसल (Andre Russell) ने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच षटकामध्ये दोन बळी घेतले. त्यानंतर त्याला मैदानात अडचणींचा सामना करावा लागला. सामन्यादरम्यान त्याला नीट चालता येत नव्हते. त्यामुळे त्याने मैदान सोडले. अशा परिस्थितीत त्याला पुन्हा मैदानात उतरणे कठीण जात आहे.

केकेआर संघासाठी (IPL 2023) आंद्रे रसल हा एक खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो मैदानातून बाहेर पडल्यामुळे संघ चिंतेत सापडला आहे. केकेआर संघाने त्याच्या बळावर अनेक सामने जिंकले आहे. त्याने आयपीएलच्या 101 सामन्यांमध्ये तब्बल 2071 धावा आपल्या नावावर केल्या आहे. त्याचबरोबर त्याने 91 विकेट घेतल्या आहे.

दरम्यान, चेन्नई आणि राजस्थान यांच्यामध्ये 12 एप्रिल रोजी सामना (IPL 2023) पार पडला होता. या सामन्यामध्ये चेन्नईला शेवटच्या बॉलवर पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. धोनीला दुखापतीमुळे राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात धावताना त्रास जाणवत होता. त्याच्या या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्सचे टेन्शन वाढले आहे.

महत्वाच्या बातम्या

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: काल (14 एप्रिल) ईडन गार्डनच्या मैदानावर हैदराबाद (SRH) आणि कोलकत्ता (KKR) संघ आमने-सामने आले …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now