NCP | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे फिरणार; निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा!

Karnataka Assembly Election 2023 | मुंबई : गेल्या महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणूकीची (Karnataka Assembly Election) घोषणा झाली. त्यामुळं अनेक राजकीय पक्ष आपली बाजी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील महिन्यात 10 मे रोजी मतदान, तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष असले तरी, इतर अनेक प्रादेशिक पक्ष या निवडणूकीत भाग घेण्याची शक्यता आहे. तसचं काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय ( NCP) पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकात निवडणूक लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला कोणतं चिन्ह मिळणार याकडे लक्ष लागलं होत. तर आता राष्ट्रवादीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, राष्ट्रवादीला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे.

कर्नाटक मध्ये 46 जागांवर निवडणुका लढणार आहोत: (Elections will be contested on 46 seats in Karnataka)

निवडणूक आयोगाला (Election Commission) पक्षाकडून विनंती करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कर्नाटक निवडणुकीसाठी मोठा दिलासा मिळाला असल्याचं सांगण्यात येते आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी यांनी सांगितलं की, आम्ही कर्नाटक मध्ये 46 जागांवर निवडणुका लढणार आहोत. आमचं चिन्ह फ्रिज झालं होतं. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. आमच्याकडे सध्याचे भाजपचे आमदार दोन दिवसांपूर्वी आले आहेत. त्यामुळे ताकद वाढणार आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर आज राष्ट्रवादीची (NCP) बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आज राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे. पक्षाकडून 46 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.