Ravindra Dhangekar | “…म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग आहे” : रवींद्र धंगेकर

Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक ही आतापर्यंत ची सर्वात महत्वाची आणि ऐतिहासिक निवडणूक म्हणून ओळखली जाते. नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला. या निवडणुकिकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कसबा मतदारसंघ हा भाजपचा (BJP) किल्ला आणलं जात होतं. परंतु आमदार रवींद्र धंगेकर यांनी ही निवडणूक जिंकून भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली अस म्हटलं तर वावग ठरणार नाही. तर त्याच काळात भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी कोण धंगेकर? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी विजयी होऊन तो मीच आमदार रवींद्र धंगेकर अशा शब्दात उत्तर दिलं होतं यामुळे हे प्रकरण अधिकच पेटलं. तसचं आता रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे. अजित पवारांच्या विधानाविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी देखील “मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल”, असं उत्तर दिल्यामुळे ते चर्चेत आले होते.

काय म्हणाले होते धंगेकर (What did Dhangekar say)

सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार रवींद्र धंगेकर यांनी “मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल” असं विधान केलं होतं. तर अजित पवार आमचे नेते आहेत. महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत. त्यांना काय, मलाही मुख्यमंत्री व्हायचंय. सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री व्हायचंय. या पलीकडे मी काही बोललो नाही”. असं मत त्यांनी मांडल. तसचं त्यावेळी आगामी पुण्याच्या खासदारकीसाठी तयार आहात का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी तर महाविकास आघाडीमधील जेष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. हा विषय माझा नाही. पक्षानं जो उमेदवार दिला, त्याला निवडून आणण्याचं काम मी करणार असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा माझ्यावर राग आहे (Eknath Shinde and Fadnavis are angry with me)

दरम्यान,आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग असल्याचं म्हटलं आहे. कारण कारण त्यांनी कासब्यात एवढे पैसे वाटूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पुणेकरांनी त्यांना माघारी पाठवलं. त्याचा राग त्यांच्या मनात आहे. राजकारणात पराभव सहन करणं त्यांच्यासाठी अवघड जात आहे. त्या पराभवातून ते अजून बाहेर पडलेले नाहीतअसं धंगेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.