Covid update | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती! आरोग्य सेवेतल्या तज्ज्ञांकडून सिरो सर्वेक्षण करण्याचं आवाहन

Covid update | मुंबई : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत असल्याचं देखील समोर आलं आहे. यामुळेच काही राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. तर मुंबई महापालिकेने देखील मास्क वापरायला सांगितले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले होते. तर आता सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवेतल्या तज्ज्ञांकडून सिरो सर्वेक्षण करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

तज्ञांना कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती (Experts fear the fourth wave of Corona)

तज्ञांनी सांगितलेल्या सर्वेक्षणा मधून कोरोनाच्या परिस्थितीचा, प्रसार, प्रचाराबद्दल धोरणे आखण्यासाठीचं नियोजन करणं शक्य होणार आहे. तर पुण्यातल्या केईएम हॉस्पिटलमधील संशोधक गिरीश दायमा यांनी सांगितलं की, “देशभरातल्या कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता चौथ्या लाटेची भीती आहे. कोरोनाचे गंभीर परिणाम दिसत आहेत. तर रुग्णालयात दाखल करण्याची गरज आणि मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसी प्रभावी ठरल्यात. परंतु अजूनही अनेक नागरीकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही. यामुळे कोरोनाचे सतत बदलणारे व्हेरिएंट तसंच कोरोना नियमांचं पालन न करणं हे चिंताजनक ठरू शकतं.” यामुळे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तर आता राज्यातील कोरोना रुग्ण संख्येने 10 हजराच्या वर आकडा पार केला आहे. तसचं २०२१ मघ्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, झालेल्या सिरो सर्वेक्षणात असं आढळून आलं होत की, ग्रामीण भागात कोरोना संसर्गामध्ये वाढ झाली आणि तीन पैकी दोघांमध्ये अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. सिरो सर्वेक्षण म्हणजे एखाद्या रोगाविरुद्ध अँटिबॉडी आहेत की नाही, याबद्दल रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली जाते. सध्या होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण आणि स्वरुप तपासण्यासाठी हे एक महत्त्वाचं साधन आहे. यामुळे लवकरात लवकर सिरो सर्वेक्षण करण्याचं आवाहन तज्ञांनी दिल आहे. तर नागरिकांनी सर्वजनिक ठिकाणी मास्क वापरले पाहिजे असं देखील सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button