Natural Toner | उन्हाळ्यामध्ये त्वचेवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ नैसर्गिक टोनर

Natural Toner | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कडक उन्हामुळे आणि घामामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टोनरचा वापर करणे महत्त्वाचे ठरू शकते. त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी टोनर उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर त्वचेची नैसर्गिक पीएच पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी टोनर फायदेशीर ठरू शकते. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या टोनरचा वापर करतात. मात्र, हे टोनर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक टोनरचा वापर करू शकतात. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खाली नैसर्गिक टोनर्स वापर करू शकतात.

गुलाब जल (Rose Water-Natural Toner for Face)

गुलाब जल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज गुलाब जलचा वापर केल्याने काळे, डाग पिगमेंटेशन इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. गुलाब जलचा टोनर म्हणून वापर करण्यासाठी तुम्हाला एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाब जलमध्ये काही थेंब ग्लिसरीनचे मिसळून घ्यावे लागेल. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करावे लागेल. दिवसातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने चेहरा चमकदार आणि मऊ होऊ शकतो.

कोरफड (Aloevera-Natural Toner for Face)

उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीचे टोनर बनवू शकतात. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. या मिश्रणामध्ये तुम्हाला चार ते पाच टी ट्री ऑइल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे लागेल. दिवसातून दोन ते चार वेळा या मिश्रणाचा चेहऱ्यावर स्प्रे केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

ग्रीन टी (Green tea-Natural Toner for Face)

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. ग्रीन टी चेहऱ्यावर टोनर म्हणून लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला एक कप पाणी उकळून घेऊन त्यामध्ये ग्रीन टी मिसळून घ्यावे लागेल. हे पाणी थंड झाल्यावर तुम्हाला चेहऱ्यावर स्प्रे करावे लागेल. दररोज चेहरा धुतल्यानंतर तुम्ही याचा टोनर म्हणून वापर करू शकतात. नियमित याचा वापर केल्याने पिंपल्स, काळे डाग इत्यादी समस्या दूर होऊ शकतात.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील नैसर्गिक गोष्टींचा टोनर म्हणून वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

दही आणि मुलतानी माती (Curd & Multani Mati For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी दही आणि मुलतानी मातीचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये पाच ते सहा चमचे दही मिसळून घ्यावे लागेल. मुलतानी माती विरघळल्यानंतर तुम्हाला ही पेस्ट साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नेहमीच शाम्पूने धुवावे लागतील. केसातील कोंडा आणि कोरड्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते.

गुलाब जल आणि मुलतानी माती (Rose Water & Multani Mati For Hair Care)

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि गुलाब जलचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. मुलतानी माती आणि गुलाब जल डोक्याला थंडावा प्रदान करतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने टाळूवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.