Felling Of Trees In Aare Area |अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित आरे परिसरातील झाडे कापली; तर आरेवासीयांनी याविरोधात दाखल केली याचिका!

Plants Cutting | मुंबई : मुंबईतील आरे परिसरातील युनिट १९ मध्ये मोठ्या प्रमाणत वृक्षतोड २०२१च्या ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती. आरेमध्ये वृक्षतोडीवर बंदी असताना ही वृक्षतोड कोणत्या परवानगीच्या आधारे होत आहे, असा प्रश्न तेथील नागरिक वारंवार करत आहेत. याचे समाधानकारक उत्तर स्थानिकांना मिळालेले नाही. त्याबाबत विचारणा करणाऱ्यांनाच उलट पोलिसांची भीती दाखवली जात आहे, असा आरोप स्थानिक करत आहेत. तर पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलं आहे. यामुळे स्थानिक लोकांनी प्रश्न उपस्थित करत विरोध करत याचिका दाखल केली.

नक्की काय आहे प्रकरण (What exactly is the case)

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो या ३ मार्गिकेच्या कामासाठी आरे कॉलनीतील १७७ झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सोमवारी (24 एप्रिल ) पहाटे कडक पोलीस बंदोबस्त झाडे कापली. परंतु १७७ पेक्षा जास्त झाडे कापल्याचा आरोप याचिकाकर्ते आणि आरेवासियांनी केला असून याबाबत तीव्र नापसंतीही व्यक्त केली आहे. पर्यावरणप्रेमी आणि आरेवासीयांचा सुरुवातीपासूनच वृक्षतोडीला विरोध आहे. यापूर्वी २०१९ मध्ये न्यायालयाच्या परवानगीनंतर रात्री एमएमआरसीने बॅन झाडे कापली. त्यानंतर तेथील आंदोलन अधिक तीव्र झाले. पण आता पुन्हा एकदा पहाटे ल पाच वाजता झाडे कापण्यात आली आहेत. सारीपुत नगरवरून मेट्रो गाडया पुढे आरे कारशेडमध्ये नेण्यासाठी ८४ झाडे कापण्याची गरज असल्याचं सांगून एमएमआरसीने याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने ही परवानगी दिल्ली. पण आता हा वाद पेटला आहे की अधीकारी अनुपस्थित असताना पहाटेच्या अंधार झाडे का कापली गेली? यावरून प्रकरण अधिकच तीव्र झालं आहे.

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित झाडे कापली ( Trees cut in absence of officials )

तसचं झाडे कापण्याची कार्यवाही करताना वृक्ष प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी (ट्री ऑफिसर) तेथे उपस्थित असणे बंधनकारक आहे. परंतु सोमवारी वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी त्याठिकाणी हजर नसल्याचा आरोप याचिकाकर्त्या अमरिता भट्टाचार्य यांनी केला आहे. १७७ पेक्षा अधिक झाडे कापण्यात आल्याचंही त्यांचं मत आहे. याबाबत एमएमआरसीकडे विचारणा केली असता त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसचं याबाबत तेथील स्थनिक लोकांनी देखील अशाच प्रतिक्रिया देत विरोध केला आहे.आशा मोये या आरे कॉलनीतील रहिवासी आहेत त्याच्या मते प्रचंड पोलीस बंदोबस्तात पहाटेच्या अंधारात झाडे कापण्यास सुरुवात केली. आमची ७८५ झाडे कापण्यात आली आहेत. त्यामध्ये चिकू, पेरू आणि इतर फळझाडे होती. फळांची विक्री करून आम्ही उदरनिर्वाह चालवत होतो. एमएमआरसीने १७७ पेक्षा अधिक झाडे कापली आहेत. ज्या झाडांवर क्रमांक नव्हता ती झाडेही कापली गेली आहेत. यामुळे आता पुढे न्यायालय काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.