Multani Mati | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Multani Mati | टीम महाराष्ट्र देशा: अनेक शतकांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचेची काळजी (Skin care) घेण्यासाठी केला जातो. त्वचेसोबतच मुलतानी माती केसांची काळजी (Hair care) घेण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. मुलतानी मातीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. मुलतानी माती केसांना मॉइश्चराईस करण्यास मदत करते. मुलतानी मातीचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी मुलतानी माती मदत करू शकते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये मुलतानी मातीचा खालील पद्धतीने वापर केल्याने केसांना अनेक फायदे मिळू शकतात.

दही आणि मुलतानी माती (Curd & Multani Mati For Hair Care)

उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी दही आणि मुलतानी मातीचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये पाच ते सहा चमचे दही मिसळून घ्यावे लागेल. मुलतानी माती विरघळल्यानंतर तुम्हाला ही पेस्ट साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नेहमीच शाम्पूने धुवावे लागतील. केसातील कोंडा आणि कोरड्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते.

गुलाब जल आणि मुलतानी माती (Rose Water & Multani Mati For Hair Care)

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि गुलाब जलचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. मुलतानी माती आणि गुलाब जल डोक्याला थंडावा प्रदान करतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने टाळूवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

मध आणि मुलतानी माती (Honey & Multani Mati For Hair Care)

मुलतानी माती आणि मधाच्या मदतीने केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. या दोन्हींमध्ये आढळणारे गुणधर्म केसांना मॉइश्चराईस करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला तीन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने मुलतानी मातीचा वापर करू शकतात. त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही खसखस खालील पद्धतीने वापर करू शकतात.

मध आणि खसखस (Honey & Poppy Seeds-For Skin Care)

खडबडीत, निर्जीव आणि कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी मध आणि खसखस उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला खसखस बारीक वाटून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिटात चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचा हायड्रेट राहते आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

दही आणि खसखस (Curd & Poppy Seeds-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खसखस आणि दह्याच्या मिश्रणाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला खसखस बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दही मिसळून घ्यावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला साधारण चार ते पाच मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या वापराने त्वचेचा रंग सुधारू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.