Eknath shinde | मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची (23 एप्रिल) ला जळगाव येथील पाचोरा या ठिकाणी सभा पार पडली. पाचोऱ्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं तर यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) देखील होते. ठाकरेंनी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मैदानात उतरले. त्यामुळे मोदींविरोधात शिंदे विरूद्ध ठाकरे असा सामना रंगला असल्याचं पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( What did Chief Minister Eknath Shinde say )
एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जे पंतप्रधान मोदींवर वक्तव्य केलं आहे त्याचा मी आधी निषेध करतो. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते द्वेषाने बोलत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान मोदी नेहमीच आपल्या भाषणातून आपण फकीर असल्याचा उल्लेख करतात. मात्र ठाकरे यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुवलेत हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, संस्कृती नाही. असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ठाकरे यांनी पाचोरा सभेमध्ये मोदींवर टीका करत म्हटलं होत की, अरे तुला आगे ना पिछ्या, तुला कुणी नाहीये. तू कधीही झोळी लटकवशील आणि निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातामध्ये भीकेचा कटोरा देऊन जाशील, त्याचं काय करायचं? मी फकीर आहे, झोळी लटकवून निघून जाईन. जाशील बाबा, पण माझी जनता भीकेचं कटोरं घेऊन फिरेल ना वणवण त्याचं काय? म्हणून काहीतरी घराण्याची परंपरा लागते, वारसा लागतो’, अशी उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जहरी टीका केली आहे. यामुळे सत्ताधारी सरकारकडून निषेध केला जातं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Indian Navy | भारतीय नौदलात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Sanjay Shirsat | “तो संजय राऊत येडा, दलाल”; संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल!
- Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन
- Weather Update | राज्यात ‘या’ भागांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
- Army Public School | आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले