Sanjay Shirsat | “तो संजय राऊत येडा, दलाल”; संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल!

Sanjay Shirsat | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांना त्यांच्या अनेक वक्तव्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारमधील नेत्यांनी चांगलंच घेरलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी हल्लाबोल करत दररोज सकाळी साडेनऊ वाजता टीव्हीवर येऊन नशा करुन कुस्ती खेळतात असा टोला राऊत यांना लगावला. तर नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बाहेर व्हाव लागतं. जे असली मातीतले पैलवान असतात तेच कुस्ती जिंकतात असंही फडणवीस म्हणाले. त्यानंतर आशिष शेलार यांनी देखील राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. तर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat ) हे देखील राऊतांवर कडाडले आहेत.

काय म्हणाले संजय शिरसाट (What did Sanjay Shirsat say)

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला की, सामना मधून म्हटलं आहे की, आगामी काळात महाविकास आघाडी सरकार बनवेल? यावर बोलताना शिरसाट यांनी राउताना हल्लाबोल करत म्हटलं आहे की, सामना मध्ये कोण लिहतय तो “संजय राऊत येडा,दलाल” आहे. तर आम्ही कोणाला भीत नाही राउताना जे बोलायचं ते बोलू द्या. महाविकास आघाडीमधीलच नेते एकमेकांला बोलत आहेत. कधी अजित पवार राउतानावर बोलतात, कधी नाना पटोले शरद पवारांना बोलतात हे त्यांनी बघावं. जर महाविकस आघाडी महारॅली काढणार आहे तर आधी अजित पवार यांना स्टेजवर बसायला खुर्ची द्या असा टोला देखील लगावला आहे. तसचं त्यांनी अजित पवार यांचं कौतुक देखील केलं आहे.

दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतात तरीही त्यांना बैठकीत बोलवलं जातं नाही अजित पवार प्रामाणिक नेते असल्याचं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर यापूर्वी संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जळगाव पाचोरा सभेत जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावेळी पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. गुलाबराव पाटील यांनी करोना काळात 400 कोटी रुपायांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर केला.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.