Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण उन्हामुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांची मदत घेऊ शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही औषधी वनस्पतींचे पाण्यात उकळून सेवन करू शकतात. कारण या वनस्पतींचे पाण्यासोबत सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि निरोगी राहते. उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील औषधी वनस्पती पाण्यात उकळून त्याचे सेवन करू शकतात.

बडीशेप (Fennel-For Health Care)

उन्हाळ्यामध्ये बडीशेपचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण बडीशेपचा प्रभाव थंड मानला जातो. त्याचबरोबर बडीशेपमध्ये विटामिन सी, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला रात्री पाण्यामध्ये बडीशेप भिजवून ठेवावी लागेल. सकाळी रिकाम्या पोटी तुम्हाला हे पाणी उकळून त्याचे सेवन करावे लागेल. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. त्याचबरोबर याचे नियमित सेवन केल्याने शरीर थंड राहते आणि पोटातील जळजळ कमी होते.

धने (Coriander-For Health Care)

धने पाण्यात उकळून प्यायल्याने आरोग्याला खूप फायदे मिळतात. धन्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन के आढळून येते, जे हाडे मजबूत बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित धन्याच्या पाण्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. सकाळी रिकाम्या पोटी धन्याचे पाणी उकळून प्यायल्याने गॅस, एसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी पचनाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही धन्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

भृंगराज (Bhringraj-For Health Care)

केसांची काळजी घेण्यासाठी भृंगराजचा वापर केला जातो. त्याचबरोबर भृंगराज आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकतो. भृंगराजमध्ये आढळणारे गुणधर्म आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर भृंगराजचा प्रभाव थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यात उकळून भृंगराजचे सेवन केल्याने तुम्ही उष्माघाताच्या समस्येपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर पोटाचे आजार बरे करण्यासाठी तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक वनस्पतींचे पाण्यात उकळून सेवन करू शकतात. त्याचबरोबर या गरम वातावरणात किवी खाल्ल्याने आरोग्याला खालील फायदे मिळतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Kiwi Benefits)

किवीमध्ये विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे डोळ्यांची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये नियमित किवीचे सेवन केल्याने दृष्टी तिक्ष्ण होते. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने डोळ्याशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Kiwi Benefits)

उन्हाळ्यामध्ये किवीचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. किवीमध्ये माफक प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचन सुधारण्यास मदत करते. नियमित किवी खाल्ल्याने गॅस, बद्धकोष्टता, ऍसिडिटी, अपचन यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर किवीचा प्रभाव ठंड असल्यामुळे किवीचे सेवन केल्याने पोटातील उष्णता शांत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.