Weather Update | राज्यात ‘या’ भागांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.

‘या’ भागांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी (Orange alert issued for rain in ‘these’ areas)

राज्यामध्ये 24 ते 28 एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला (Weather Update) जात आहे. यादरम्यान विदर्भामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 आणि 26 एप्रिल रोजी यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर 25 आणि 26 एप्रिल वगळता इतर दिवशी पावसाचा येल्लो अलट जारी करण्यात आलेला असून, विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), झारखंड, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, दक्षिण छत्तीसगडचा किनारपट्टी भाग आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर सिक्कीम ओडिसामध्ये देखील पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.