Poppy Seeds | त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खसखसचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Poppy Seeds | टीम महाराष्ट्र देशा: खसखस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर खसखस आपल्या त्वचेसाठी (Skin Care) देखील उपयुक्त ठरू शकते. खसखसमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. खसखस त्वचा चमकदार आणि स्वच्छ बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर त्वचेवरील अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खसखस मदत करू शकते. खसखसचा खालीलप्रमाणे उपयोग केल्याने त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात.

मध आणि खसखस (Honey & Poppy Seeds-For Skin Care)

खडबडीत, निर्जीव आणि कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी मध आणि खसखस उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला खसखस बारीक वाटून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिटात चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचा हायड्रेट राहते आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

दही आणि खसखस (Curd & Poppy Seeds-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खसखस आणि दह्याच्या मिश्रणाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला खसखस बारीक करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दही मिसळून घ्यावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला साधारण चार ते पाच मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या वापराने त्वचेचा रंग सुधारू शकतो.

दूध आणि खसखस (Milk & Poppy Seeds-For Skin Care)

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही खसखस आणि दुधाच्या मिश्रणाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दुधामध्ये दोन ते तीन तास खसखस भिजवून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला कोरडी होईपर्यंत त्वचेवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. त्वचेची जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने खसखसचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

तणाव कमी होतो (Reduces stress-Poppy Seeds Benefits)

खसखसमध्ये अँटीडिप्रेसेंट गुणधर्म आढळून येतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही तणाव किंवा चिंतेमध्ये असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात खसखस समावेश केला पाहिजे. रोज रात्री झोपण्यापूर्वी खसखस खाल्ल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी खसखसचे सेवन केल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते (Improves digestion-Poppy Seeds Benefits)

उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना पचनाशी संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही खसखसचे सेवन करू शकतात. खसखसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. खसखस खाल्ल्याने गॅस, एसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दुधामध्ये मिसळून खसखसचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या