Share

Kiwi Benefits | उन्हाळ्यामध्ये नक्की करा किवीचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

🕒 1 min readKiwi Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका वाढतो. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही पोषक आहाराचे सेवन करू शकतात. यामध्ये तुम्ही किवीचे सेवन करू शकतात. किवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये विटामिन ई, विटामिन सी, आयरन, फायबर, … Read more

Published On: 

🕒 1 min read

Kiwi Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका वाढतो. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही पोषक आहाराचे सेवन करू शकतात. यामध्ये तुम्ही किवीचे सेवन करू शकतात. किवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये विटामिन ई, विटामिन सी, आयरन, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फोलेट, सोडियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर किवीचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कीवीचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये किवी खाल्ल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Kiwi Benefits)

किवीमध्ये विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे डोळ्यांची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये नियमित किवीचे सेवन केल्याने दृष्टी तिक्ष्ण होते. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने डोळ्याशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Kiwi Benefits)

उन्हाळ्यामध्ये किवीचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. किवीमध्ये माफक प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचन सुधारण्यास मदत करते. नियमित किवी खाल्ल्याने गॅस, बद्धकोष्टता, ऍसिडिटी, अपचन यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर किवीचा प्रभाव ठंड असल्यामुळे किवीचे सेवन केल्याने पोटातील उष्णता शांत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते (Increases immunity-Kiwi Benefits)

उन्हाळ्यामध्ये किवीचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. किवीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. नियमित किवीचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर नियमित किवी खाल्ल्याने तुम्ही सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.

उन्हाळ्यामध्ये किवीचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

मध (Honey-For Dry Lips)

ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकतात. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे ओठांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला ओठांवर दहा ते पंधरा मिनिटे मध लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ थंड पाण्याने धुवावे लागतील. नियमित मधाचा वापर केल्याने ओठ मऊ आणि चमकदार होऊ शकतात.

काकडी (Cucumber-For Dry Lips)

उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. काकडीमध्ये 90% पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. कोरड्या ओठांच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे काकडीचा रस ओठांवर लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ सामान्य पाण्याने धुवावे लागतील. दिवसातून एक ते दोन वेळा याचा उपयोग केल्याने ओठ मऊ आणि चमकदार होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!