Supriya Sule । अदानींच्या कंपनीमध्ये सुप्रिया-सदानंद सुळेंचे कोटींचे शेयर्स; शरद पवारांनी केली होती अदानीची पाठराखण

Supriya Sule । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अदानी समूहांवरील हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल ( Hindenburg Research Reports ) हा वादाचा विषय बनला आहे.  काही कंपनीच्या शेयर्स मध्ये घसरण झाली यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर आजून अदानी वरील आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठराखण गेली केलेली पाहायला मिळत आहे.  तर आता यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. अदानी कंपनीच्या शेयर्स मध्ये शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जावई सदानंद सुळे यांच्याकडे अदानीच्या सहा कंपनीचे ४५ हजार शेयर्स आहेत. याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील अदानी पोट चे ७० शेयर्स खरेदी केल्याचं समोर आलं आहे. सध्या त्यांच्या या शेयर्स ची किंमत ४६ हजार २७० एवढी आहे याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणूक शपथपत्रात ही माहिती दिली होती. या सर्व प्रकरणामध्ये राजकीय क्षेत्रातील अनेकांचे शेयर्स असल्याने याचा फटका हिंडेनबर्ग रिसर्च अहवालानंतर बसला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च अहवालाआधी इतके होते शेयर्सची किंमत (Before the Hindenburg Research report, the share price was)

तर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या शपथपत्रात म्हंटलं होत की, २०१९ ला या शेअर्सची किंमत फक्त ७४ लाख ६१ हजार रुपये एवढं होतं. पुढाल तीन वर्षात या शेयर्सची किमती प्रचंड वाढल्या. तर २०२२ मध्ये सुळे दांपत्याच्या अदानी समूहातील शेयर्सचे किंमत तब्बल ११ कोटी ६८ लाख रुपये इतकी झाली आहे. परंतु, जानेवारी महिन्यात जो हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल आला त्यामुळे शेयर्स घसरले. यामुळे सध्या या शेयर्सची किंमत २ कोटी ८४ लाख रुपये इतकी झाली. यामुळे याचा आर्थिक फटका सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना चांगलाच बसला आहे. तसचं सुप्रिया सुळे यांनी पुढील प्रमाणे आपले शेयर्स अदानी यांच्या कंपनीत गुंतवले आहेत. यामध्ये अदानी एंटरप्रायजेस एकूण २००० शेयर्स संख्या होती तर सध्या त्याची किंमत ३६.६ लाख आहे. अदानी गॅस २००० शेयर्स संख्या तर किंमत १८.३४ लाख आहे. अदानी पोर्टर्स ८८७९शेयर्स ची संख्या तर सध्याची किंमत ५८.६९ लाख आहे. अदानी पॉवर शेयर्स संख्या ९७१९ शेयर्स संख्या तर किंमत १९.३४ लाख इतकी आहे. अदानी ट्रान्समिशन शेयर्स संख्या २००० तर किंमत १९.८८लाख आहे याचप्रमाणे अदानी ग्रीन एनर्जी शेयर्स संख्या १५२२ तर सध्याची किंमत १३.९४ लाख आहे. तर सुप्रिया सुळे यांची एकूण शेयर संख्या २६१२० इतकी असून १.६६ कोटी आहे. तसेच त्यांचे पती सदानंद सुळे यांचे देशील शेयर्स आहेत.

यामध्ये सदानंद सुळे यांची  शेयर्स संख्या आणि गुंतवणूक पुढील प्रमाणे,  अदानी एंटरप्रायजेस एकूण १००० शेयर्स संख्या होती तर सध्या त्याची किंमत १८.३ लाख आहे. अदानी गॅस १००० शेयर्स संख्या तर किंमत ९.१७ लाख आहे. अदानी पोर्टर्स ७३५७ शेयर्स ची संख्या तर सध्याची किंमत ४८.६२ लाख आहे. अदानी पॉवर शेयर्स संख्या ७८५९ शेयर्स संख्या तर किंमत १५.६३ लाख इतकी आहे. अदानी ट्रान्समिशन शेयर्स संख्या १००० तर किंमत ९.९४लाख आहे याचप्रमाणे अदानी ग्रीन एनर्जी शेयर्स संख्या ७६१ तर सध्याची किंमत ६.९७ लाख आहे. तर सदानंद सुळे यांच्या नवे असलेली एकूण गुंतवणूक आणि शेयर्स संख्या ही १८९७७ असून सध्याची किंमत ७.८ कोटी आहे. अशा प्रकारे सुळे दाम्पत्याकडे अदानी शेयर्स आहे.

दरम्यान, हिंडेनबर्गने २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये शेअर्सच्या किमतींशी छेडछाड करण्यासोबत फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते. अदानी समुहावरील हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांची संपत्ती १५० अब्ज डॉलरवरून $५३ अब्ज इतकी शिल्लक राहिली आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत अदानी तिसऱ्या क्रमांकावरून ३५व्या क्रमांकावर गेला होता. त्याचवेळी गौतम अदानी यांच्या समूहाला १२० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन कराव लाग;लागला आहे.

महत्वाच्या बातम्या-