Share

Sharad Pawar | कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देणार; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा!

Sharad Pawar | अमरावती : राजकीय वर्तुळात शिंदे गटाने गेलेल्या बंडानंतर वातावरण पूर्ण ढवळून निघालं आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) काही नेत्यांना घेऊन भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबल लागला यावरून राजकीय चर्चा रंगल्या होत्या. अशा अनेक गोष्टी अजित पवार यांच्यासोबत घडल्याने ते भाजप मध्ये जाणारच अस सांगितलं जातं होत. परंतु त्यांनी याला पूर्णविराम देत मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार असल्याचं म्हटलं. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar ) यांना देखील भाजपला इशारा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपच्या गेल्या काही महिन्यांपासून चालेला फोडाफोडीवर योग्यवेळी भूमिका घेऊ, कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देऊ. अशा शब्दात पवारांनी भाजपला इशारा दिला आहे. यामुळे आता शरद पवार हे मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहे.

दरम्यान, खारघरच्या दुर्घटनेमध्ये देखील भाष्य करत सत्ताधारी सरकारवर निशाणा लगावला होता. अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला असून त्याची जबाबदारी ही शिंदे फडणवीस सरकारची असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कडक उन्हात गर्दी जमवून आपल्याला अनुकूल वातावरण करण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तर या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांच्यामार्फत करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

Sharad Pawar | अमरावती : राजकीय वर्तुळात शिंदे गटाने गेलेल्या बंडानंतर वातावरण पूर्ण ढवळून निघालं आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे …

पुढे वाचा

Maharashtra Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now