Sanjay Raut | अहमदनगर : सध्या राजकीय वर्तुळात खासदार संजय राऊत यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. तर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस युतीचं सरकार असलं तरी भाजप नेत्यांकडून वारंवार देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं जात आहे. यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं पहायला मिळत आहे.
तसचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आगामी काळात मुख्यमंत्री केलं जाईल का? अशी शंकाही व्यक्त होत आहे. याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस हे देखील उपमुख्यमंत्री होण्यास इच्छुक नव्हते. जाहीर कार्यक्रमात त्यांनी याची कबुलीही देखील दिली आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी टोला लगावला आहे की, त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं असा टोला त्यांनी लगावला आहे.
विखे पाटलांना मंगळसूत्र बदलण्याची सवय: संजय राऊत (Vikhe Patals have habit of changing Mangalsutra: Sanjay Raut)
आज 23 एप्रिल ला जळगाव येथे उद्धव ठाकरे यांची सभा आहे. यामुळे संजय राऊत सध्या जळगावात आहेत. तर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “मुख्यंत्रीपदावर त्यांना बसवा, कोणी थांबवलं आहे तुम्हाला. जर तुमच्या मनात कोणी वेगळं असेल आणि दुसऱ्यासोबत नांदत असाल तर हा व्यभिचार आहे. लग्न एकाशी, वरलं एकाला आणि संसार एकाशी यासारखा व्यभिचार नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) गळ्यात जाऊन मंगळसूत्र बांधावं. आम्ही कुठे थांबवलं आहे, आम्हालाही ते चालतील”. असा खोचक टोला विखे पाटीलांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Eknath Khadse । ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका’; एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य!
- Kishor Patil । “संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना संपवायची सुपारी तर घेतली नाही ना?” : किशोर पाटील
- Sanjay Raut | संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप; म्हणाले…
- Supriya Sule | “दगडफेक करणं महाराष्ट्राचे संस्कार नाहीत”; सुप्रिया सुळेंचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल
- Coronavirus Update । कोरोना रुग्णसंख्येत वाढ ‘या’ जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची सूचना