Share

Sanjay Raut | संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप; म्हणाले…

🕒 1 min readSanjay Raut | मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर आज जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पाचोरा या ठिकाणी सभा होणार आहे. यापूर्वी च राऊतांनी गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर आज जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पाचोरा या ठिकाणी सभा होणार आहे. यापूर्वी च राऊतांनी गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल 400 कोटींचा घोटाळा : संजय राऊत (400 crore scam in Jalgaon district in the name of Corona: Sanjay Raut)

खासदार संजय राऊत म्हणाले की, “माझ्याकडे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे कागदपत्र आहेत. कोरोना काळात पालकमंत्री म्हणून आणि जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून गुलाबराव पाटील यांनी चढ्या भावाने बेफाम खरेदी केली. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध यांचा समावेश आहे. 2 लाख रुपयांच्या व्हेंटिलेटरची खरेदी 15 लाखात करण्यात आली. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांचे जीव वाचवण्यापेक्षा गुलाबराव पाटील हे प्रत्येकावर दबाव आणून खरेदी करुन घेत होते.” तसचं त्यांनी फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

दरम्यान, याआधी देखील पुरावे मी फडणवीस यांच्याकडे पाठवली आहेत परंतु अनेक प्रकरण त्यांनी दाबली. “मी गृहमंत्री झाल्याने काही लोकांच्या अडचणी वाढल्या असल्याचं फडणवीस म्हणत असतील तर त्यांचा हा गैरसमज आहे. कारण फडणवीस गृहमंत्री झाल्याने भ्रष्टाचारी, लफंगे, लुटमारी करणारे खुश झाले आहेत. आपला बाप आला असं त्यांना वाटतंय. शेतकऱ्यांचे पैसे कसे लुटले याबाबत पुरावे दिले. पण गृहमंत्र्यांनी काय केलं, त्यांना कोण घाबरत आहे. आता गुलाबराव पाटील यांचे प्रकरण पाठवत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर गुलाबराव पाटील आणि देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!