Radhakrishna Vikhe Patil । “देवेंद्र फडणवीसचं आमच्या मनातील मुख्यमंत्री” : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्य वरून चर्चा रंगल्या आहेत. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं अजित पवार म्हणाले असल्याने याबाबत चर्चाना उधाण आलं आहे. तर गेल्यावर्षी जुलै महिन्यात पनवेलमधल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य केलं होतं. तर रुसून न बसता केंद्रातल्या नेत्यांचा आदेश आपण ऐकल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यामुळे एकनाथ शिंदे यांना नाइलाजाने मुख्यमंत्री केलं का असा प्रश्न उपस्थित केला जातं होता तर आता भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले विखे पाटील: (What Vikhe Patil said)

एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान विखे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे की, देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या आमच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे देखील चांगले नेते आहे. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस हेच असल्याचं विखे पाटील म्हणाले. तसचं अजित पवारांच्या मनात काय? या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, “राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले शरद पवार हे संपूर्ण राज्याला संभ्रमात टाकले आहे. पण आता अजित पवार यांनी शरद पवारांना देखील संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही.
यामुळे याबाबत मी जास्त बोलणं योग्य नाही असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, जेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं होतं असं वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर देखील अनेकदा फडणवीसच आमचे मुख्यमंत्री असल्याचं भाजप नेत्यांकडून दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यातच आता, ‘आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच असल्याचं’ वक्तव्य विखे पाटील यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे. त्यामुळे आता शिंदे- फडणवीस सरकार मध्ये आपापसात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे तर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता देखील आहे.

महत्वाच्या बातम्या-