Indian Army | भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Indian Army | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण भारतीय सैन्यामध्ये भरती प्रक्रिया (Indian Army Recruitment) सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारतीय सैन्याच्या (Indian Army) या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सिव्हिल-11 पदे, मेकॅनिकल- 09 पदे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स- 04 पदे, संगणक अनुसूचित जाती आणि अभियांत्रिकी- 06 पदे, इलेक्ट्रॉनिक्स- 08 पदे, इतर अभियांत्रिकी प्रवाह- 02 पदे भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Indian Army) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Army) दिनांक 17 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना खालील अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

महत्वाच्या बातम्या