IPL 2023 | क्रिकेटमधून धोनीची निवृत्ती? विजयानंतर कॅप्टन कूलच्या ‘त्या’ वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

IPL 2023 | चेन्नई: आयपीएल सीझन सुरू झाल्यापासून धोनीच्या निवृत्तीबाबत सतत चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी (21 एप्रिल) झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ने सनराइजर्स हैदराबाद विरुद्धच्या विजयानंतर चेन्नईबद्दल प्रेम व्यक्त करत, निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.

चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबाद (IPL 2023) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर धोनीने प्रतिक्रिया देत काही विषयांवर प्रकाश टाकला आहे. यावेळी धोनीने चेन्नईबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना धोनी म्हणाला, “चेन्नईतील प्रेक्षकांकडून मला जे प्रेम मिळत आहे, त्यामुळे मी भारावून गेलो आहे. चेन्नईमध्ये खेळणं नेहमीच माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीमधला शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे त्याचा आनंद घेणं खूप महत्त्वाचं आहे.”

घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉक मैदानावर महेंद्रसिंग धोनीला नेहमीच चाहत्यांकडून प्रेम मिळालं आहे. धोनीच्या आणि चेन्नई संघाच्या फॅन फॉलिंगबद्दल बोलताना धोनी म्हणाला, “इथे येऊन मला नेहमीच छान वाटतं. चाहत्यांनी मला आणि संघाला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. चाहते मला बघण्यासाठी शेवटपर्यंत थांबतात.”

महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यापासून धोनीने आयपीएल शिवाय कोणताही क्रिकेट सामना खेळला नाही. त्यामुळे आयपीएल 16 हा हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असेल, अशी शक्यता चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button