Weather Update | पुढील 5 दिवस राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी हवामानात बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) कोसळत आहे. तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात पुढील पाच दिवस राज्यामध्ये विजांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. त्याचबरोबर विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये गारांसह पाऊस कोसळला आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार अवकाळी पाऊस (Unseasonal rain will fall at ‘this’ place in the state)

राज्यामध्ये पुणे, सातारा, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र ते तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.