Rohit Pawar | तमिळनाडू सरकारचं अभिनंदन! तर शिंदे- फडणवीस सरकारवर रोहित पवारांचं टीकास्त्र

Rohit pawar| मुंबई: महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रकल्प, उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याने महाविकास आघाडी सरकारने शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच हल्ला चढवला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले, त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारा रोजगार गेला, तसंच, महाराष्ट्राचंही आर्थिक नुकसान झालं. असा दावा महाविकास आघाडीकडून सातत्याने करण्यात येतोय. याबाबत आदित्य ठाकरे यांनी देखील आपल्या सभेमध्ये उल्लेख करताना सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनीही तमिळनाडूत गेलेल्या एका उद्योगाबाबत ट्वीट करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

तसचं नाइकी, आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन ही कंपनी भारतातील तमिळनाडू या राज्यमध्ये 2300 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तर तमिळनाडू सरकारचं “2300 कोटी गुंतवणुकीचा आणि 20 हजार युवांना रोजगार देणारा पो चेन कंपनीचा प्रकल्प खेचून आणणल्याबाद्दल अभिनंदन देखील केलं आहे.” तर रोहित पवारांनी महाराष्ट्र सराकरावर खोचक टीका करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्राबद्दल अशा बातम्या दिसत नसत नाहीत. आपला महाराष्ट्र मागे पडत आहे हे पाहून दुःख होत आल्याचं देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ही पो चेन कंपनी ही पादत्राणे बनवणारी कंपनी आहे. तर विविध फुटवेअर कंपन्यांसाठी पो चेन कंपनी ही उत्पादन करते. तर या कंपनी मार्फत 2022 मध्ये 272 मिलिअनपेक्षा जास्त पादत्राणे जागतिक स्तरावर विकली केली आहेत. यामुळे ही कंपनी रोजगार उपलब्ध करून देणारी महत्वाची कंपनी मानली जाते.

महत्वाच्या बातम्या-