Besan For Hair | बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मऊ आणि चमकदार

Besan For Hair | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाणे पिण्याचे सवयीमुळे केसांना समस्यांना (Hair problems) सामोरे जावे लागते. केसांच्या या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकतात. होय! बेसनाच्या मदतीने केसांच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. बेसनामध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी घेण्यास मदत करतात. बेसनाचा खालील पद्धतीने वापर केल्याने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.

ऑलिव्ह ऑइल आणि बेसन (Olive oil & Besan For Hair)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल आणि बेसनाचा उपयोग करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये आवश्यकतेनुसार ऑलिव्ह ऑइल, अर्धा चमचा बदाम पावडर आणि विटामिन ई कॅप्सूल मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस माइल्ड शाम्पूने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस चमकदार, लांब आणि मऊ होऊ शकतात.

खोबरेल तेल आणि बेसन (Coconut oil & Besan For Hair)

बेसन आणि खोबरेल तेलाच्या मदतीने केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला पाच चमचे बेसन पिठामध्ये खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केस खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केस चमकदार होऊ शकतात.

मध आणि बेसन (Honey & Besan For Hair)

कोरड्या केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी मध आणि बेसनाचे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे बेसनामध्ये मध आणि खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना लावून ठेवावे लागेल. अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसांच्या वाढीस चालला मिळते आणि केस मजबूत होतात.

दही आणि बेसन (Curd & Besan For Hair)

बेसन आणि दही केसांना लावल्याने केस लांब आणि चमकदार होऊ शकतात. बेसन आणि दही यांचे मिश्रण केसांना लावल्याने केस दाट, लांब आणि मुलायम होतात. हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्हाला दोन चमचे दही आणि दोन चमचे बेसन घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण 30 मिनिटे केसांना लावून ठेवावे लागेल. 30 मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस कोमट पाण्याने धुवावे लागतील.

मेथी पावडर आणि बेसन (Fenugreek powder & Besan For Hair)

बेसन आणि मेथी पावडर केसांना लावल्याने केस मजबूत आणि चमकदार होऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसन घेऊन त्यामध्ये एक चमचा मेथी पावडर आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळावे लागेल. या सर्व गोष्टी एकत्र मिसळून त्यांची चांगली पेस्ट बनवल्यानंतर तुम्हाला ते केसांवर लावून ठेवावे लागेल. साधारण 30 मिनिटे तुम्हाला हे मिश्रण केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सामान्य पाण्याने केस धुवावे लागतील.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या