Share

MPSC Exam | MPSC च्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाल्याने खळबळ; तर आयोगाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक!

🕒 1 min read MPSC Exam | मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क (MPSC Group B And C Hall Tickets) संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटच टेलिग्राम लिंक रविवारी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या लिंकमध्ये ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आल्याची … Read more

Published On: 

🕒 1 min read

MPSC Exam | मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब आणि गट क (MPSC Group B And C Hall Tickets) संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटच टेलिग्राम लिंक रविवारी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या लिंकमध्ये ९० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आल्याची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे एमपीएससीकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.

तसचं हा केवळ नमुना डेटा आहे, आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची खालील माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे,, असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे. याचप्रमाणे एमपीएससीच्या परीक्षेचे हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक व्हायरल होत असल्याची दखल एमपीएससीकडून घेण्यात आली. ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात एमपीएससी माहिती घेत आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमपीएससीकडून मिळाली आहे.

दरम्यान, टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्य लिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली. या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसचं या चॅनलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा हा खोटा असून अशाप्रकारे कोणताही डेटा किंवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही. असं देखील सांगाण्यात आलं आहे. परंतु वयक्तिक माहिती जर अशा पद्धतीने लिक होत असेल तर हा आयोगाचा भोंगळा कारभार आहे असं म्हणत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या