प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: ५०० कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “जरांगे पाटलांना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही पडला आहे,” असे शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, ते स्वतः गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाचा शोध घेत आहेत. ज्या व्यक्तीकडे हे पैसे पाठवले गेल्याची चर्चा आहे, तो व्यक्ती अद्याप सापडलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या ५०० कोटींच्या आरोपांची सुरुवात दसरा मेळाव्यातून झाल्याचे बोलले जाते. आता या संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या संदर्भात अधिक बोलताना श्रीकांत शिंदे यांनी जोर देत सांगितले की, “मी स्वतः या ५०० कोटींच्या संदर्भात शोध घेत आहे. मला काही कळल्यास मी सांगणार आणि तुम्हाला कळल्यास तुम्ही सांगा.” त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर कथित गैरव्यवहाराचे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर
- ३०० टी-२० सामने खेळणारा भारत दुसरा संघ; न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक टप्पा
- आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा; स्टीफन जोन्स यांची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती
Quick Answers
५०० कोटींच्या कथित आरोपांवर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "जरांगे पाटलांना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही पडला आहे."
श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, ते स्वतः गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाचा शोध घेत आहेत आणि ज्या व्यक्तीकडे हे पैसे पाठवले गेल्याची चर्चा आहे, तो व्यक्ती अद्याप सापडलेला नाही.
या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








