एपस्टीन फाइल्सचा भारताच्या राजकारणावर परिणाम होणार, ट्रम्प यांचा पराभव निश्चित; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाइल्सवरून भारताच्या राजकारणात परिवर्तन अटळ असल्याचे म्हटले असून, मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरूनही खळबळजनक आरोप केले आहेत.

Published On: 

Prithviraj Chavan speaking at a press conference

सातारा, 24 ऑक्टोबर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाइल्सप्रकरणी मोठा दावा केला आहे. या फाइल्समधील दोन फोटो समोर आले असून, लवकरच तिसरा फोटो किंवा व्हिडिओ उघड होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. एपस्टीन फाइल्समधील कागदपत्रे सार्वजनिक करण्यासाठी कायदा करणारी अमेरिकेची संसदच आता ही माहिती समोर आणत असल्याचे त्यांनी नमूद केले. या घडामोडींचा परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो आणि देशात परिवर्तन अटळ असल्याचे सूचक विधान चव्हाण यांनी केले आहे.

अमेरिकेच्या राजकारणावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले की, येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा दोन्ही सभागृहांत दारुण पराभव होईल. तसेच, ट्रम्प यांना महाभियोगाला सामोरे जावे लागू शकते, असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपवण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोप करत, या ऑडिओ क्लिपचे तांत्रिक व फॉरेन्सिक विश्लेषण करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. याशिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर दिली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, शिंदे यांनी ती ऑफर स्वीकारली नसल्याचेही ते म्हणाले.

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निकालावरून चव्हाण यांनी सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. २५-० असा एकतर्फी निकाल लागेल आणि आपण गुलाल खेळू, या अपेक्षेने मुख्यमंत्री कोल्हापुरात गेले होते, मात्र कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारले, अशी टीका त्यांनी केली. ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपचा दावा, सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि गोकुळच्या निकालावरील टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते, एपस्टीन फाइल्समधील दोन फोटो समोर आले असून लवकरच तिसरा फोटो किंवा व्हिडिओ उघड होण्याची शक्यता आहे. तसेच या घडामोडींचा परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो आणि देशात परिवर्तन अटळ असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही