Nana Patole । नाना पटोलेंचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले …

Nana Patole । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलताना, २०२४ नव्हे तर आताही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं विधान केलं होतं. या विधानामुले राजकीय वर्तुळात चर्चना उधाण आलं आहे. तर कॉग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार यांच्या विधानांचा समाचार घेतला. तसचं अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत देखील भाष्य केलं होत यावरून देखील पटोले यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

काय म्हणाले नाना पटोले (What did Nana Patole say)

‘२०१०मध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार मंत्री होते. त्यांचा नाईलाज होता तर त्यांनी मंत्रिपदाची शपथ कशासाठी घेतली? तेव्हाच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अजित पवार यांनी असं बोलावी, ही अपेक्षा नाही’. तसचं राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली, तर त्यात वावगे काहीच नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे १४५ हा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे’, असा टोला देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमवेत चार वर्षे वरिष्ठांच्या सांगण्यावरून नाइलाजाने काम करावे लागल्याची खदखद अजित पवार यांनी म्हटलं होत त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील प्रतिकिया देत म्हंटलं होत की, माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांना नाइलाजाने काम करावे लागले असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्याबरोबर काम करायचे की नाही हे त्यांनी ठरवायचं होतं . अशा शब्दात अजित पवार यांचा त्यांनी समाचार घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-