Share

एकनाथ शिंदेंनी ‘जय गुजरात’चं रहस्य उघड केलं! उद्धव ठाकरेंचा जुना VIDEO दाखवून विरोधकांनाच घेरलं!

Eknath Shinde explains his “Jai Gujarat” slogan as praise for Gujarati community and shows an old Uddhav Thackeray video to hit back at critics.

Published On: 

Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray

मुंबई: पुण्यात एका कार्यक्रमात “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा दिल्यानंतर विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेले एकनाथ शिंदे यांनी अखेर यावर स्पष्टीकरण दिले आहे. गुजराती समुदायाच्या योगदानाची प्रशंसा करण्यासाठी आपण ही घोषणा दिल्याचा दावा त्यांनी केला, तसेच विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी “शिंदेंच्या पोटातलं आज ओठावर आलं,” अशी खोचक टीका केली होती

एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, “गुजराती बांधवांनी समाजाच्या हितासाठी पुण्यात एक मोठे संकुल उभारले आहे. मी भाषणाच्या शेवटी नेहमी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणत असतो. आजच्या कार्यक्रमात मी ‘जय गुजरात’ म्हणालो, कारण माझ्यासमोर उपस्थित असलेल्या समुदायाने वर्षांनुवर्षे-पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राला कर्मभूमी मानून काम केले. पुण्यात त्यांनी उभे केलेले संकुल सर्वांसाठी आहे. त्यामुळे त्यांची प्रशंसा करण्यासाठी मी ‘जय गुजरात’ असे म्हणालो. मराठी हा आमचा श्वास आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे. मराठीबद्दल माझ्यावर जे टीका करत आहेत, त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

Eknath Shinde explains his “Jai Gujarat” slogan

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओही दाखवला. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात “जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा दिली होती. तसेच, वरळी येथे आदित्य ठाकरे यांनी “केम छो वरळी” असे बॅनर लावल्याची आठवणही एकनाथ शिंदे यांनी यावेळी करून दिली.

एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांचे कौतुक करताना म्हटले की, “अमित शाह हे गुजराती असले तरी ते महाराष्ट्राचे जावई आहेत. ते होम मिनिस्टर असले तरी त्यांच्या घरातील होम मिनिस्टर आपल्या कोल्हापूरच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. महाराष्ट्र आणि गुजरातने विकास, उद्योग, संस्कृतीच्या क्षेत्रात देशाला नेहमीच दिशा दाखवली आहे.” यानंतर एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांसाठी एक शेर ऐकवून भाषणाचा शेवट करताना “जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा दिली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही