Sharad Pawar । 2024 ची निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

Sharad Pawar | मुंबई : आगामी 2024 च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून चर्चा रंगू लागल्या आहेत. तर 2024 मध्ये महाविकास आघाडी (maha vikas aghadi) एकत्र निवडणुका लढणार की नाही हे आता कसं सांगणार, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. यामुळे महाविकास आघाडी मध्ये फूट पडण्याची शक्यता पाहायला मिळतं आहे. यामुळे राजकीय समीकरणे देखील बदलत असल्याचं चित्र दिसत आहे. तसचं शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं वक्तव्य 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडी लढणार की नाही याबाबत केलं आहे यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

काय म्हणाले शरद पवार (What did Sharad Pawar say)

शरद पवार काल (23 एप्रिल) अमरावती दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छा पुरेशी नसते, त्यामध्ये जागांचे वाटप अजून काहीचं केलं नाही. त्यामुळं आताच त्याबाबत कसं सांगता येईल असं शरद पवार म्हणाले. तसेच वंचित आघाडीसोबत आमची कोणतीही चर्चा झाली असं देखील त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार अशी चर्चा जोर धरत आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. याबाबत काँग्रेस आणि शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी सारवासारव करत म्हंटलं की, शरद पवार हे महाविकास आघाडीतील जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या मनात तसं काहीही नाही, त्यांच्या वक्तव्याचा कोणताही अर्थ काढू नये. सध्या महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. आमच्या एकत्र मोठ्या सभा होत आहेत. तर येत्या 1 मे ला मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासीक सभा होत आहे. तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडी तयार करण्यात शरद पवारांचा मोठा वाटा आहे. तसचं उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींचाही वाटा आहे. शरद पवारांची पहिल्यापासून एकत्र निवडणुका लढण्याची इच्छा आहे. 2024 साली आपण भाजपला पराभूत करू ही पवारसाहेबांची भूमिका होती यामुळे आगामी निवडणूक एकत्र लढू असं देखील संजय राऊत म्हणाले. परंतु शरद पवार यांनी अजूनही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचं देखील दिसून येत आहे यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.