Sanjay Raut | ‘या’ घोटाळ्याबाबत संजय राऊतांची थेट सीबीआयकडे तक्रार; केलं नरेंद्र मोदी-ईडीला टॅग!

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना पत्र देखील लिहित या घोटाळ्याबद्दल कारवाईची मागणीही केली. तर आता संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) आणि ईडीला टॅग (Ed) करत सीबीआयकडे (CBI)तक्रार केली आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण येऊ शकत.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं ( What Sanjay Raut said in a tweet )

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मी सीबीआयकडेकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या 500 कोटींच्या घोटळ्याबाबत मी केलेल्या तक्रारारीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने डोळेझाक केलं. त्यामुळे मी आता सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत. बघूया पुढे काय होतं ते, असंही ते ट्विटमध्ये म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला टॅग केलं आहे. यामुळे चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, आता सीबीआय या प्रकरणी काय दखल घेतं हे पाहवं लागणार आहे. तर खासदार संजय राऊत सातत्याने सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसतात. राऊत यांना काही महिन्यांपूर्वी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारागृहात जावं लागलं होतं. त्या प्रकरणातून बाहेर आल्यानंतर राऊत आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला टॅग करत सीबीआयकडे तक्रार केली आहे. यामुळे हे प्रकरण वादाचा विषय बनू शकतो असं देखील म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.