Pune City Police | पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दुचाकीस्वारांनो फुटपाथवरून गाडी चालवू नका नाहीतर…..

Pune Police | पुणे : शहर म्हटलं की सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे वाहतूक कोंडी. मग ती मुंबई असो, ठाणे असो किंवा शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे असो. पुण्यात (Pune) ट्राफिकची समस्या काही नवीन नाही. दिवसेंदिवस पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसंच वाहतूक नियम देखील नागरिक मोडता असताना भरपूर लोक सापडतात. त्यामुळे आता पुणे वाहतूक पोलीस (Pune Police) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी एक नविन मोहिम राबवली आहे.

काय आहे पुणे वाहतूक पोलीसांचं ट्विट (What is the tweet of Pune Traffic Police)

या मोहिमेबाबतची माहिती पुणे पोलिसांनी ट्विटरवर काही फोटो पोस्ट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी फुटपाथवरून गाडी चारवणाऱ्यांवर कारवाई करतानारे काही फोटो टाकले आहेत. ही पोस्ट शेअर करत त्यांनी फुटपाथवरून गाडी न चालवण्याचे अवाहनही केलं आहे. तसंच जर फुटपाथवरून गाडी चालवणारे दिसले तर त्यांच्यावर जागेवरच कारवाई केली जाणार असल्याचंही या पोस्टमधून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, दुचाकीस्वारांना शिस्त लावण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या मोहिम राबवल्या जात आहेत. यामधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. तसंच आता चालकांनी फुटपाथवरून गाडी न चालवण्यासाठी पोलिसांनी नवीन मोहिम राबवली आहे. जर नागरिकांनी सतर्क राहून गाडी चालवली तर अपघात होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तसचं पुण्यातील काही भागांमध्ये रात्री 6 ते9 यावेळेत सर्वाधिल वाहतूक कोंडी होत असते ही कोंडी होऊ नयेत म्हणून पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.