Buttermilk | उन्हाळ्यामध्ये रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Buttermilk | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. त्याचबरोबर ताकामध्ये फॅट आणि कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही ताकाचे सेवन करता येते. मात्र, रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला अधिक फायदे मिळतात. रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो. त्याचबरोबर रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळतात.

शरीर थंड राहते (The body remains cool-Buttermilk Benefits)

उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी ताक उपयुक्त ठरू शकते. ताकामध्ये आढळणारे गुणधर्म शरीराला थंडावा प्रदान करतात. उन्हाळ्यामध्ये दिवसभर शरीराला थंड ठेवण्यासाठी तुम्ही रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन करू शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यामध्ये जिरे, पुदिना आणि काळे मीठ घालून त्याचे सेवन करू शकतात. रोज रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने व्यवस्थित झोप लागू शकते.

शरीराला ऊर्जा मिळते (The body gets energy-Buttermilk Benefits)

उन्हाळ्यात उष्णतेमुळे अतिरिक्त थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन करू शकतात. ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि विटामिन्स आढळून येतात, जे शरीरातील थकवा दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर ताकामध्ये रिबोफ्लेविन नावाचे एक तत्त्व आढळून येते, जे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.

त्वचा हायड्रेट राहते (Skin stays hydrated-Buttermilk Benefits)

ताकामध्ये 90% हून अधिक पाणी आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स देखील आढळून येतात, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत खालील औषधी वनस्पतींचे सेवन करू शकतात.

बडीशेप (Fennel-For Health Care)

उन्हाळ्यामध्ये बडीशेपचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण बडीशेपचा प्रभाव थंड मानला जातो. त्याचबरोबर बडीशेपमध्ये विटामिन सी, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला रात्री पाण्यामध्ये बडीशेप भिजवून ठेवावी लागेल. सकाळी रिकाम्या पोटी तुम्हाला हे पाणी उकळून त्याचे सेवन करावे लागेल. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. त्याचबरोबर याचे नियमित सेवन केल्याने शरीर थंड राहते आणि पोटातील जळजळ कमी होते.

धने (Coriander-For Health Care)

धने पाण्यात उकळून प्यायल्याने आरोग्याला खूप फायदे मिळतात. धन्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन के आढळून येते, जे हाडे मजबूत बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित धन्याच्या पाण्याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. सकाळी रिकाम्या पोटी धन्याचे पाणी उकळून प्यायल्याने गॅस, एसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी पचनाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही धन्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या