Sharad Pawar | “मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील…”; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | पुणे : सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरी ही सुनावणी चालू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात नेमकं काय चित्र पहायला मिळणार? यावरुन अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यात या चर्चांना आणखीणच जोर आला आहे. पण आता यावर शरद पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

 उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल. माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल, लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. ते जर उडाले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवारांची प्रतिक्रिया (Sharad Pawar’s Reaction)

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एमपीएससी परीक्षार्थींशी संवाद साधला. यानंतर माध्यमांशी केलेल्या चर्चेमध्ये पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाबाबत शरद पवारांना विचारणा केली असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

“मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील…”

“उद्धव ठाकरेंनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलं नाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असं मला वाटत नाही. मला तरी आत्ता तशी स्थिती आहे असं वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-