Sanjay Raut | “नारायण राणेंना तर बाईनं पाडलंय”; अजितदादांच्या या वक्तव्यावर राऊतांची स्तुतीसुमनं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | मुंबई : राज्यात शिवसेना फुटीवरुन मोठा वाद सुरु आहे. शिवसेना फोडण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलं. एकीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना राजकारणात मोठा उत आला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. शिंदे गटाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात असून त्यांच्यावर होणाऱ्या टीका-टिप्पणीवर राऊतही प्रत्युत्तर देत आहेत.

या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून रीट्वीट केलेला एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणातला हा व्हिडीओ असून त्यामध्ये अजित पवार केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) मिश्किल भाषेत टिप्पणी करताना दिसत आहेत.

संजय राऊतांचं ट्वीट (Sanjay Raut’s twit) 

संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये अजित पवारांना ‘कमाल की चीज’ असा उल्लेख केला आहे. तसेच, नेता असाच असतो असंही राऊत म्हणाले आहेत. “दादा म्हणजे कमाल की चीज! नेता असाच असतो, एकदम मोकळाढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

“राणेंना तर बाईनं पाडलं बाईनं” (Ajit Pawar Comment on Narayan Rane)

संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी खोचक शब्दांत टीका केलेलं पहायला मिळत आहे. अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचाही संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचं वक्तव्य केलं आहे. “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना बाईनं”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या