Weather Update | पुढील 4 दिवस तापमानात बदल होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील तापमानात (Temperature) दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अजून मार्च महिना सुरू झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुढील पाच दिवस वातावरणातील उष्णता (Heat) आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील चार दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअसने जास्त राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवण्यात (Weather Update) आले आहे. सर्वसाधारणपणे एवढे तापमान मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवले जाते. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उष्णताची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे यावर्षी उष्णतेची तीव्र लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

कमाल तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता (Chances of significant change in maximum temperature)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), वायव्य भारतामध्ये कमान तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने अधिक राहणार असण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्यातील वाढते (Weather Update) तापमान शेतीतील पिकांसाठी हानिकारक आहे. फेब्रुवारी महिन्यात थंडीचा जोर काही प्रमाणात कायम असतो. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. त्यामुळे शेतीतील पिकांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

दरम्यान, या बदलत्या वातावरणात (Weather Update) नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

महत्वाच्या बातम्या