Sanjay Raut | नवी दिल्ली : शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली होती. “संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे ते काहीही बरळत असतात. राऊत यांनी आपलं आडनाव बदलून आगलावे ठेवावं”, असा खोचक सल्ला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला होता. शहाजी बापू पाटील यांच्या या सल्ल्यावर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“हा कोण शहाजी? हा काय खरा शहाजी आहे का? याने शहाजी नाव बदललं पाहिजे. नाहीत तर भोसले घराण्याचा अपमान होतोय सारखा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Shahaji Bapu Patil Comment on Sanjay Raut
“संजय राऊत खासदार आहेत. त्यांच्या सारख्या व्यक्तीने दोन हजार कोटींचे डील झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. या देशात केंद्रीय निवडणूक आयोगामुळे लोकशाही टिकून आहे. निवडणूक आयोगासारख्या संस्थांवर टीका करुन संजय राऊत जनसामान्यात लोकशाही विषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हणाले आहेत.
“राऊतांची मानसिकता बिघडली, नागापेक्षा विषारी फुत्कार”
निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे साहेबांनी दिलेल्या मजबूत पुराव्यामुळे लागला आहे. संध्या संजय राऊत यांची मानसिकता बिघडली आहे. संजय राऊत लोकशाही आणि समाजाची मानसिकता बिघडवण्याचं महापाप करत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणार नाही. संजय राऊत नागापेक्षाही विषारी फुत्कार त्यांच्या तोंडातून टाकत आहे. महाराष्ट्र सुजान आहे. राज्यातील जनता संजय राऊत यांच्यांसारख्यांच्या विधानांवर कुठलीही भीक घालत नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
“महाराष्ट्रातील संपूर्ण मंत्रिमंडळ या दोन मतदारसंघात होतं. केंद्रीय गृहमंत्रीही पुण्याला पाय लावून गेले. चिंचवड आणि कसब्यासाठी भाजप ज्या पद्धतीने जोर लावत आहे ते पाहता भाजपला ही निवडणूक किती अवघड झालीय हे स्पष्ट होतं. काल आदित्य ठाकरे यांनी कसब्यात प्रचंड रोड शो केला. सभा घेतल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकदिलाने आणि एकमताने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांनीही व्हिडीओ द्वारे भाषण केलं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का?”; राऊतांचा श्रीकांत शिंदेंना सवाल
- Sanjay Raut | “नारायण राणेंना तर बाईनं पाडलंय”; अजितदादांच्या या वक्तव्यावर राऊतांची स्तुतीसुमनं
- Jayant Patil | “ही निवडणूक सर्वांसाठी एक संधी, गद्दारांना आणि महाराष्ट्राद्रोहींना धडा शिकवण्याची”
- Job Opportunity | जॉब अलर्ट! नागपूरमध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी
- Job Vacancies | ‘या’ योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी, आजच करा अर्ज
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले