Sadanand Kadam | रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

Sadanand Kadam | मुंबई : शिवसेनेचे खासदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू सदानंद कदम(Sadanand Kadam) यांच्यावर ईडीने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे. त्यावरुन सदानंद कमद यांना ईडीने अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गट नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल परब (Anil Parab)  हे देखील आरोपी असल्याचं बोललं जात आहे.

Sadanand Kadam arrested by ED

सदानंद कदम  हे अनिल परब आणि त्यांचे साथीदार यांचे जवळचे सहकारी आहेत. सदानंद कदम हे शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू आहेत. कदम यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सदानंद कदम यांची त्यांच्या कार्यालयात याप्रकरणी चौकशी केली होती.

डिसेंबर 2022 मध्ये बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स अॅक्ट (PBPT) अंतर्गत ‘साई रिसॉर्ट’ तात्पुरते संलग्न केल्यानंतर कदम यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्राप्तिकर विभागाला आव्हान दिले होते. अनिल परब हे रिसॉर्टचे लाभार्थी मालक असून कदम हे बेनामीदार असल्याचा आरोप आयकर विभागाने केला होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं व संशयास्पद खरेदी-विक्रीचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी माजी मंत्री अनिल परब यांचंही नाव आलं होतं.

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती. दापोलीतल्या कुठेशी गावात ईडीचे पथक १० मार्च रोजी सर्च ऑपरेशन साठी गेलं होतं. त्यानंतर कदम यांना चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच कदम यांना ईडीनं आज सकाळी त्यांना ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ असले तरी ते अनिल परब  यांच्या जवळचे मानले जातात. सदानंद कदम यांच्या अटकेमुळे आता अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-