Share

Weather Update | कोकणात उष्णतेची लाट, तर विदर्भात अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका जाणवायला लागला असताना मार्च महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढायला लागला आहे. कोकणामध्ये उष्णताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून ( Maharashtra rain update ) देण्यात आली आहे.

विदर्भामध्ये ( Vidarbha Weather Update ) बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यामध्ये कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी उर्वरित कामं लवकरात लवकर उरकून घ्यावी, असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

कोकणामध्ये तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज ( Heat wave in Kokan )

कोकणामध्ये तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी मध्ये 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कोकणामध्ये सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदवण्यात आले आहे. दरम्यान, कोकणकरांना उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.

राज्यामध्ये रात्रीच्या किमान तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे गहू संशोधन केंद्रात 10 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. तर आज (11 मार्च) विदर्भामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात करण्यात आली आहे. कोकणामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून ( Maharashtra rain update ) देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका जाणवायला लागला असताना …

पुढे वाचा

Agriculture Maharashtra Marathi News weather

Join WhatsApp

Join Now