Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Cough | टीम महाराष्ट्र देशा: सध्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या निर्माण होते. सर्दीची समस्या लवकर बरी होते, मात्र खोकल्याची समस्या लवकर बरी होत नाही. कोरडा खोकला दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचे सेवन करतात. पण ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे कोरड्या खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. कोरड्या खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

मध आणि आले (Honey and ginger-For Dry Cough)

आल्यामध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे कोरडा खोकला दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर मधामध्ये आढळणारे गुणधर्म खोकला दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला आल्याचे काही तुकडे पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. या पेयाचे सेवन तुम्ही दिवसातून तीन वेळा करू शकतात. मध आणि आल्याच्या मदतीने तुमचा कोरडा खोकला सहज दूर होऊ शकतो.

हळदीचे दूध (Haldi milk-For Dry Cough)

कोरडा खोकला दूर करण्यासाठी हळदीचे दूध एक रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे कोरडा खोकला दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधामध्ये हळद मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. या दुधाचे सेवन केल्याने कोरडा खोकला दूर होतो आणि त्याबरोबर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

तुळशीचा चहा (Basil tea-For Dry Cough)

कोरडा खोकला दूर करण्यासाठी तुळशीचा चहा उपयुक्त ठरू शकतो. कारण यामध्ये आढळणारे गुणधर्म कोरडा खोकला कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला पाण्यामध्ये तुळशीची काही ताजी पाने उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मिश्रणामध्ये मध देखील मिसळू शकतात. दिवसातून दोन ते तीन वेळा या चहाचे सेवन केल्याने तुमचा कोरडा खोकला सहज दूर होऊ शकतो.

कोरडा खोकला दूर करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक औषधींचा वापर करू शकतात.

आवळा (Amla-Ayurvedic Tips For Hair Care)

आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये विटामिन, मिनरल, ओमीनो ॲसिड, फॅटी ॲसिड इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे घटक केस मजबूत बनवण्यास मदत करतात. त्याचबरोबर आवळ्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म टाळूवरील घाण दूर करून कोंडा दूर करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवळ्याचा रस मिसळून केसांना लावावा लागेल. एक तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. नियमित याचा वापर केल्याने केस गळतीची समस्या कमी होऊ शकते.

मेथी दाणे (Fenugreek seeds-Ayurvedic Tips For Hair Care)

कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. कोरफडीमध्ये विटामिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. कोरफडीच्या मदतीने टाळूमधील रक्ताभिसरण वाढते आणि केसांना पोषण मिळते. यासाठी तुम्ही थेट कोरफडीचा गर केसांना लावू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या