Share

Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक असलेले इच्छुक उमेदवार आजपासूनच … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक असलेले इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मुंबई उच्च न्यायालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) कायदा लिपिक पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – 400 001

जाहिरात पाहा (View ad)

https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20230303162323.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://bombayhighcourt.nic.in/index.php

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या