Share

Job Opportunity | पुणे महानगरपालिकेत (PMC) नोकरीची संधी, आजच करा अर्ज

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 320 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08 जागा, वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी- 20 जागा, उपसंचालक – 01 जागा, पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2) – 02 जागा, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक- 20 जागा, आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3) – 40 जागा, कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 10 जागा, वाहन निरीक्षक – 03 जागा, मिश्रक / औषध निर्माता – 15 जागा, पशुधन पर्यवेक्षक – 01 जागा, अग्निशामक विमोचक / फायरमन – 200 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://www.pmc.gov.in/recruitment/files/recruitment_advertisement_2023.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://pmc.gov.in/landing/mar.html

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ibpsonline.ibps.in/pmcfeb23/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!