Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission NHM) सिंधुदुर्ग यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 73 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी (पीजी) / Medical Officer (PG) 01 जागा, वैद्यकीय अधिकारी (युजी) / Medical Officer (UG) 05 जागा, वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 23 जागा, विशेषज्ञ / Specialist 33 जागा, सुपरस्पेशालिस्ट / Super Specialist 03 जागा, दंत शल्यचिकित्सक / Dental Surgeon 01, सुविधा व्यवस्थापक / Facility Manager 01 जागा, ऑडिओलॉजिस्ट / Audiologist 01 जागा, फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist 01 जागा, डायलोसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician 03 जागा, सामाजिक कार्यकर्ता / Social Worker 01 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 16 मार्च पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग, NHM कक्ष, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग.

जाहिरात पाहा (View ad)

https://cdn.s3waas.gov.in/s3fae0b27c451c728867a567e8c1bb4e53/uploads/2023/03/2023030694.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://sindhudurg.nic.in/

महत्वाच्या बातम्या