Skin Care | होळीच्या रंगांमुळे त्वचा खराब झाली असेल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: काल म्हणजेच 8 मार्च रोजी देशात सर्वत्र होळी साजरी केली गेली. रंगांशिवाय होळीचा सण अपूर्ण असतो. मात्र, रंग खेळल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. होळी खेळल्यानंतर त्वचेला मोठ्या प्रमाणात इजा होते. त्याचबरोबर रंग खेळण्याच्या आधी त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचेवरील चमक निघून जाऊ शकते. होळीच्या रंगांमध्ये केमिकल वापरले जातात, त्यामुळे त्वचेला एलर्जी, खास इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे होळी खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. होळी खेळल्यानंतर तुम्ही पुढील पद्धतीने त्वचेची काळजी घेऊ शकतात.

त्वचेला मॉइश्चराईज करा (Moisturize the skin-Skin Care After Holi)

होळीनंतर रंग काढण्यासाठी बहुतांश लोक वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात. या उत्पादनांचा वापर केल्यामुळे त्वचा कोरडी व्हायला लागते. अशा परिस्थितीत त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्वचेला मॉइश्चराइज करणे खूप महत्त्वाचे आहे. त्वचेला व्यवस्थित मॉइश्चराईज केल्यानंतर त्वचा चमकदार होते आणि त्वचेला पोषणही मिळते.

बर्फाचे तुकडे (Ice cubes-Skin Care After Holi)

होळीचे रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी बर्फाचे तुकडे फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्हाला बर्फाच्या तुकड्याने त्वचेवर मसाज करावी लागेल. बर्फाच्या मदतीने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा चमकदार होते. त्याचबरोबर बर्फाचे तुकडे लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात.

सनस्क्रीन (Sunscreen-Skin Care After Holi)

होळीनंतर घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते आणि त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. होळीनंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे आहे.

होळीचे रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील टिप्स फॉलो करू शकतात. त्याचबरोबर दातांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक उपाय करू शकतात.

मोहरीचे तेल आणि मीठ (Mustard Oil And Salt-For Teeth Care)

मोहरीचे तेल आणि मीठ वापरून दातांवरील पिवळेपणा दूर करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला दीड चमचा मिठामध्ये दोन चमचे मोहरीचे तेल मिसळून घ्यावे लागेल. या पेस्टच्या मदतीने तुम्हाला हलक्या हाताने दात स्वच्छ करावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने तोंडातील बॅक्टेरिया दूर होतो आणि त्याचबरोबर दातही चमकू लागतात.

ऑइल पुलिंग (Oil Pulling-For Teeth Care)

आजकाल ऑइल पुलिंग ही पद्धत लोकप्रिय होत चालली आहे. ऑइल पुलिंग केल्याने दातातील सर्व बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दातांचा पिवळेपणा सहज दूर होतो. यासाठी तुम्हाला एक चमचा तिळाच्या तेलामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण दहा मिनिटं तोंडामध्ये ठेवावे लागेल. याचा वापर केल्याने दातांची दुर्गंधी कमी होते आणि दात हळूहळू चमकायला लागतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या