Sanjay Raut | मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या होळी, धुलिवंदनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेते रंगांची उधळण करत सण साजरा करत होते. “आमच्या मित्रांना भांग पाजवली गेली”, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“भांग पिऊन सत्तेत, नशा उतरली की सत्ता जाईल”
‘भांग कुणी पाजली? त्यांनीच का? महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलंय? ती भांग उतरली की सत्ता जाईल. आम्ही पूर्णपणे शुद्धीत आहोत. राज्यातील जनताही शुद्धीत आहे, हे कसब्याच्या निकालाने स्पष्ट झालं. भागं पिऊन जे सत्तेत बसले आहेत. त्यांना कळेल महाराष्ट्र आणि राज्यातील जनता काय आहे. त्यांची सर्व भांग कसब्यात उतरली आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊतांनी माध्यमांशी बोलतानाही राज्य सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर ट्वीट करुनही राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
संजय राऊतांचे ट्वीट (Sanjay Raut’s Twit)
“विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात… हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे. बांधावर पिकं आडवी झाली… शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं… ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय?”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात… हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे.
बांधावर पिकं आडवी झाली… शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं…
ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय? pic.twitter.com/C4n31vYqtw— Sanjay Raut (@rautsanjay61) March 8, 2023
“राज्यातील जनता भांग पिऊन काही काम करत नाही. तसं असतं तर कसब्याचा निक्काल लागला नसता. आम्ही विरोधी पक्ष आणि जनता चांगल्या मनाने काम करत आहोत. त्यामुळे पुढील काळात त्यांची भांग उतरल्याशिवाय राहणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
Sanjay Raut Criticize State and Central Government
“या देशातील आणि राज्यातील परिस्थिती तशीच आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवला तर गुन्हेगार ठरवलं जातं. लोकांना घाबरवलं जात आहे. या देशात चुकीला चूक म्हणणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं. त्यांच्या विरोधात चौकशी लावली जाते”, असं लाल प्रसाद यादव यांच्या घरावर सीबीआयच्या धाडी पडल्या त्यावर बोलताना सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Teeth Care | दातांची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय
- Job Opportunity | ST महामंडळामध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज
- Rain Update | राज्यात 9 मार्च पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Job Opportunity | दिल्ली उच्च न्यायालयात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
- Bitter Gourd | रिकाम्या पोटी कारल्याचा चहा प्यायल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका