Rain Update | राज्यात 9 मार्च पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असताना मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मंगळवारी 7 मार्च रोजी राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

7 ते 9 मार्च दरम्यान राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Rain Update) आली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर ८ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर आणि बीड जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

गेल्या चार दिवसापासून राज्यातील वातावरणात खूप बदल झाला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सकाळच्या वेळी थंड वातावरण आणि दुपारच्या वेळी ऊन तापू लागले आहे. अशा परिस्थितीत 7, 8 आणि 9 मार्च रोजी राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट जनसामान्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

11 ते 13 मार्चपासून देशातील तापमानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Rain Update) आली आहे. तर येत्या 24 तासात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button