Garlic Juice | केसांना लसणाचा रस लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Garlic Juice | टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच निरोगी आणि मजबूत केस हवे असतात. त्यामुळे केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय शोधत असतो. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन केसांची दीर्घकाळ काळजी घेऊ शकत नाही. केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या लसणाचा वापर करू शकतात. लसणामध्ये आढळणारे पोषक तत्व केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. लसणामध्ये विटामिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि मॅग्नीज यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे केसांना लांब, जाड आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही लसणाचा रस वापरू शकतात. तुम्ही खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलसोबत मिसळून केसांना लसणाचा ज्यूस लावू शकतात. कारण थेट लसणाचा रस लावल्याने केसांना हानी पोहचू शकते. खोबरेल तेल आणि ऑइलसोबत लसणाचा रस केसांना लावल्याने पुढील फायदे मिळू शकतात.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth-Garlic Juice Benefits)

केस लांब आणि दाट बनवण्यासाठी लसणाचा रस उपयुक्त ठरू शकतो. लसणामध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या वाढीस चालना देतात. केसांची वाढ वाढवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये लसणाचा रस मिसळून ते मिश्रण केसांना लावू शकतात.

केसातील कोंडा दूर होतो (Removes dandruff-Garlic Juice Benefits)

केस आणि टाळूमध्ये घाण साचल्याने कोंड्याची समस्या निर्माण होते. कोंडा दूर करण्यासाठी लसणाचा रस केसांना लावणे खूप फायदेशीर ठरू शकते. नियमित खोबरेल तेलामध्ये लसनाचा रस मिसळून केसांना लावल्याने कोंड्याची समस्या सहज दूर होऊ शकते.

केस गळती थांबू शकते (Hair loss can be stopped-Garlic Juice Benefits)

केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लसणाचा रस तुमची मदत करू शकतो. लसणाच्या रसामध्ये आढळणारे गुणधर्म आणि पोषक तत्व केस गळती थांबवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही जर केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुम्ही लसणाचा रस केसांना लावू शकतात.

केसांच्या वरील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लसणाच्या रसाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय वापरू शकतात.

कोरफड (Aloevera-For Skin Irritation)

चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. कोरफडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर थेट चेहऱ्यावर लावावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोरफडीच्या गरामध्ये काही थेंब गुलाब जल मिसळू शकतात. कोरफडीच्या मदतीने तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.

कडुलिंब (Neem-For Skin Irritation)

त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. कडुलिंबामध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, जे जळजळ आणि खाज कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पाण्याने अंघोळ देखील करू शकतात. या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवरील बहुतांश समस्या सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या