Uddhav Thackeray | ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार???; फडणवीस, बावनकुळेंकडून ठाकरेंना साद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. शिवसेना फुटीचा वाद उद्यापही संपलेला नाही. शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही रखडून आहे. शिंदे-ठाकरे गटात खडाजंगी सुरु आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तारही केला नाही. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीक-टिपण्णी सुरु आहे. सध्या होळी, धुलिवंदन सण राज्यभरात साजरे केले जात असतानाच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्राने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय बदल पाहिले आहेत.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडाने मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच देण्याचा निर्णय दिला तेव्हा राज्यात पुन्हा भूकंप झाला होता. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात टोकाची कटुता निर्माण झाली आहे. मात्र आता धुळवडीच्या निमित्ताने हीच कटुता कमी करण्यासाठी भाजपने (BJP) पाऊल उचलल्याचं दिसून आलं आहे.

ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार???

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गट आणि भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून वारंवार शिंदे गट आणि भाजपवर आगपाखड करत आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान आता महाराष्ट्र भाजपची वाटचाल उद्धव ठाकरेंसोबतचा वाद संपवण्याच्या दिशेला होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तशा आशयाची वक्तव्ये केली आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंसोबतची कटुता संपवण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळाले आहेत. “आमच्या मित्रांना कुणीतरी भांग पाजला होता, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. विरोधकांनी असा नशा करण्यापेक्षा आता चांगली कामे करावीत”, असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे.

“आमच्या मित्रांना कुणीतरी भांग पाजली”

“आमचे काही मित्र आहेत त्यांना कुणीतरी खोटं सांगून भांग पाजून दिलं. त्यानंतर दिवसभर त्यांचं जे काही चाललं होतं, कुणी गाणं म्हणत होतं, कुणी रडतच होतं. हे सगळं पाहून मजा आली. पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा करावा, संगीताचा, कामाच नशा करावा”, असं आवाहन त्यांनी केलं.

“आमच्या मनात आता कोणतीही कटुता नाही”

“आम्ही विधानसभेत उभं राहून म्हटलं होतं की, अनेकांनी आम्हाला त्रास दिला. या सगळ्या लोकांचा आम्ही बदला घेऊ. आम्ही त्यांना आधीच माफ केलं आहे. आमच्या मनात आता कोणतीही कटुता नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“संजय राऊतांनी मतभेद आणि मनभेद विसरुन काम करावं”, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. “मी संजय राऊत यांना विनंती करेन की त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद बाजूला सारुन एकत्रितपणे महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम करावं”, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याच्या दिशेने येत वाटचाल होत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरेंसोबत कटुता संपवण्याचं चांगलंच मनावर घेतल्याचं दिसत आहे. आता ठाकरे यावर काय उत्तर देणार? भाजपच्या या भूमिकेकडे ठाकरे गांभिर्याने घेत आपली दिशा बदलणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-