Dry Skin | होळीच्या रंगामुळे त्वचा कोरडी झाली असेल, तर वापरा ‘हे’ नैसर्गिक फेसपॅक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dry Skin | टीम महाराष्ट्र देशा: काल म्हणजेच 8 मार्च रोजी देशात सर्वत्र होळी साजरी केली गेली. रंगांशिवाय होळीचा सण अपूर्ण असतो. मात्र, रंग खेळल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. होळी खेळल्यानंतर त्वचेला मोठ्या प्रमाणात इजा होते. त्याचबरोबर होळीचा रंग खेळल्याने कोरड्या त्वचेची समस्या वाढू शकते. कोरड्या त्वचेच्या समस्यावर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे होळीनंतर चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा वापर करू शकतात. घरगुती फेसपॅक वापरल्याने त्वचेवरील कोरडेपणा दूर होऊ शकतो. होळीनंतर त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही पुढील फेसपॅक वापरू शकतात.

कोरफड आणि बेसन (Aloevera and gram flour-For Dry Skin)

कोरफड आणि बेसनाच्या मदतीने चेहऱ्यावरील अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. त्याचबरोबर या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या देखील कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये दोन चमचे कोरफडीचा गर आणि एक चमचा बेसन मिसळून घ्यावे लागेल. हा फेसपॅक तुम्हाला साधारण 25 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

केळी आणि चंदन (Banana and Sandalwood-For Dry Skin)

चंदनामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला शांत करण्यास मदत करतात. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे गुणधर्म चेहऱ्यावरील इतर समस्या दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला केळी मॅश करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार चंदन पावडर मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते साधारण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. हे मिश्रण कोरडे झाल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचे मदतीने कोरडेपणा हळूहळू दूर होईल.

कोरफड आणि गुलाब जल (Aloe and rose water-For Dry Skin)

त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि गुलाबजालाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला कोरफडीच्या गरामध्ये आवश्यकतेनुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. 15  मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील कोरडेपणा झपाट्याने दूर होऊ शकतो.

त्वचेवरील कोरडेपणा घालवण्यासाठी तुम्ही वरील उपाय फॉलो करू शकतात. त्याचबरोबर त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

ग्लिसरीन आणि लिंबाचा रस (Glycerin and lemon juice-For Oily Skin)

तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा स्वच्छ होऊन त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाऊ शकते.

ग्लिसरीन आणि गुलाब जल (Glycerin and rose water-For Oily Skin)

तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब जल फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा ग्लिसरीनमध्ये एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील चमक वाढू शकते.

ग्लिसरीन आणि मुलतानी माती (Glycerin and Multani Mati-For Oily Skin)

तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीमध्ये ग्लिसरीन मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर साधारण दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने पिंपल्स आणि फ्रिंकल सारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.