Weather Update | राज्यातील तापमानात होणार वाढ, तर ‘या’ ठिकाणी बरसणार पावसाची सरी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा (Heat Wave) चांगल्याच जाणवायला लागल्या होत्या. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वातावरणात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सूर्य पुन्हा तापायला सुरुवात करणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तापमानात होणार वाढ (Increase in temperature)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात तब्बल 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. या तापमान वाढीचा सर्वात जास्त तडाका कोकण किनारपट्टीला बसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, तर काही भागात विजांच्या कडकडांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

विदर्भामध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे. मात्र, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये 10 मार्च रोजी सुद्धा पाऊस पडू शकतो. तर मध्य महाराष्ट्रामध्ये तापमानात पाच ते सहा अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या चार दिवसापासून राज्यातील वातावरणात खूप बदल झाला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सकाळच्या वेळी थंड वातावरण आणि दुपारच्या वेळी ऊन तापू लागले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट जनसामान्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या